लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील व परिसरातील सेवाभावी संस्था व मित्रमंडळ प्रतिष्ठानच्या वतीने उद्योजक मा.श्री.मनीष शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या मध्ये लोणी काळभोर केसकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप तसेच अल्प आहार देण्यात आला. 

लोणी काळभोर परिसरात  ५०० हुन अधीक फळझाडे वाटप करण्यात आले, तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगाने १०१ जंगली आठ फुटी  वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच उन्हाळा चालू झाला आहे डोंगर भागात प्राणी पक्षी  खुप आहेत यांना पाण्या साठी वनवन फिरावे लागत आहे ही वनवन थांबण्यासाठी वाढदिवसानिमित्त पाणवठा तयार करण्यात येणार आहे यांचे उद्घाटन माजी ग्रा.सदस्य मा.श्री पांडुरंग केसकर यांच्या हस्ते करण्यात आले. तीर्थक्षेत्र रामदरा येथे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने वृक्षसंवर्धन मोहिमेसाठी ५ ड्रिप बंडल, २० पी.व्ही.सी.पाईप वाढदिवसानिमित्त देण्यात आले. या वेळी लोणी काळभोर ग्रा.सदस्य श्री.नागेश काळभोर, उद्योजक श्री.शेखर भाऊ काळभोर,माजी ग्रा.सदस्य श्री. पांडुरंग केसकर, प्रगतशील शेतकरी श्री.जयराम केसकर, सूर्यकांत काळभोर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगे , दादासाहेब कोळपे,दत्तात्रय काळभोर, बाबासाहेब यादव  तसेच शिवशाही प्रतिष्ठान लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती लोणी काळभोर, ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी काळभोर, समस्त कदम वाक वस्ती लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.