.
सोनई--भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व नगर जिल्हा सरचिटणीस नेवासा येथील नितीन दिनकर यांनी मोठा डामडौल न करता गरजू गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना पाणसवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य विशाल बापुराव धनगर,प्रगतशील शेतकरी नारायण शिंदे,लक्ष्मण लोणारी(पानसवाडी ग्रामपंचायत कर्मचारी )व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे,किरण धनगर राजेंद्र दुधे यांच्या हस्ते शालेय जीवनात गरजू वस्तूचे वाटप करण्यात आले.यात वही,पेन,याचा समावेश होता.८० हुन अधिक मुला - मुलींना वस्तूचे वाटप करण्यात आले.
समाजात अजूनही असंख्य गोरगरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हातात शालेय वस्तू दिसत नाही, त्यांना एकप्रकारे शिक्षणाची आवड,व साक्षरता होण्यासाठी खरी गरज असल्याचे विशाल धनगर यांनी सांगितले .या वेळी तालुक्यातील विविध गावात स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

