shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


सामोडे- (दिलीप घरटे प्रतिनिधी):
अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस हा महान वैज्ञानिक डॉ सी.व्ही.रमण यांच्या स्मरणार्थ  साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य झेड एम गवळी , उमेश माळी होते.प्रथमत: डॉ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रा.विजय ठाकरे यांनी वैज्ञानिक मूल्य रुजवणे या विषयावर तर प्रा.प्रविण पगारे यांनी सी.व्ही.रमण यांचे कार्य या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. 

राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त प्रा.विजय ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान बहुपर्यायी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तर विजय ढोले व भावसार जी.पी.यांनी विद्यार्थ्यांना चित्रफित दाखवली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन जी.डी.नेरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा. भिकन पारधी, शिक्षक शरद सुर्यवंशी, गोरख.बी.पवार, श्रीमती पोर्णिमा भामरे, श्रीमती संगीता सोनवणे, चारुशीला पवार आदी प्रयत्नशील होते
close