श्रीरामपूर प्रतिनिधी:
जनसेवा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय डॉ. सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत सेंट झेवियर्स स्कूल, श्रीरामपूरच्या ७ विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळवून इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे. इ. ६ वी मधून वैद्य अनुराग संजय व घागरे एलिया ईमॅन्युअल हे दोघे समान गुण मिळवून तालुक्यात प्रथम आलेले आहेत.


विद्यार्थ्यांमधील प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढीस लागणे हा या परीक्षेचा उद्देश आहे या परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)च्या सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटाला भेट देण्याची संधी मिळते, यावेळी तेथील रॉकेट प्रक्षेपण, रॉकेट लॉन्चिंग पॅड, मिशन कंट्रोल युनिट, शास्त्रज्ञांशी संवाद व माहिती घेता येते. इ.५ वी मधून कु.डेरे स्वरांगी अभिजीत तालुक्यात पाचवी,

 इ. ७ वी मधून गलांडे साईश युवराज तालुक्यात तिसरा, इ.८वी मधून कु.सहानी जान्हवी राकेश तालुक्यात दुसरी तसेच इ.९वी मधून वाकचौरे रुशांक योगेश तालुक्यात चौथा तर कंत्रोड पुनीत किशोर तालुक्यात पाचवा आला आहे. दरवर्षी तालुका व जिल्हा स्तरावर या परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण होण्याची परंपरा झेवियर्स च्या विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य मा. फादर टायटस यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर