श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील मराठा लाईट इन्फंट्री च्या सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की आपल्या मराठा रेजिमेंटचे रेकॉर्ड ऑफिस बेळगाव येथून आपल्या सेवानिवृत्त सैनिकांचे विविध प्रकारचे मेडल्स (पदक )त्रिदल सैनिक सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आलेले असून ज्या सेवानिवृत्त सैनिकांचे नाव वर्तमानपत्रात प्रसिद्धीस दिलेले आहेत त्या माजी सैनिकांनी रविवार दिनांक ७ मे २०२३ पासुन ते रविवार दिनांक १४ मे २०२३ च्या सायंकाळपर्यंत खालील 9922193074, व 92842655630 या दोन्ही भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांकावर संपर्क साधून त्रिदल सैनिक सेवा संघाचे संपर्क कार्यालय,सिद्धिविनायक मंदिरच्या पुढे कॅनॉल च्या कडेला या कार्यालयात येऊन आपापले आलेले मेडल्स (पदक) घेऊन जावेत असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यादीतील नावे खालील प्रमाणे आदिक विलास जनार्दन - खानापूर, बागडे बाबासाहेब सिताराम - खैरी निमगाव, भुजबळ सुनील विठ्ठल - बाभळेश्वर, देठे शाम दिनकर - कुरणपूर फत्याबाद, गायधने अनिल संपत - निपाणी वडगाव, केदारे भगवान निंबाजी - निपाणी वडगाव, लोखंडे बाबासाहेब तुकाराम - बेलापूर खुर्द, सिन्नरकर अनिल नामदेवराव - श्रीरामपूर अशोकनगर, मेहत्रे संदीप चांगदेव - बेलापूर, शेख समीर अब्दुल गणी - पढेगाव, सोनवणे दत्तात्रय केशव - रांजणखोल टिळकनगर, ढोकणे संतोष आदिनाथ - वळद उंबरगाव, गायधने विजय फक्कड - निपाणी वडगाव, शिंदे विजय घनश्याम - पुणतांबा (वारी) सध्या श्रीरामपूर,भोपाते महादेव दिनकर - कारेगांव अशा प्रकारे यादीत नाव आहेत इतरही आपल्या संपर्कात असलेल्या किंवा नातेवाईक असलेल्या माजी सैनिकांशी देखील संपर्क साधून त्यांनाही आपले मेडल्स पदक घेऊन जाण्यास अवगत करावे अशा प्रकारचे आवाहन त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार तसेच तालुकाध्यक्ष मेजर संग्रामजीत यादव यांनी केले आहे.
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

