पतंजली योग परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
इंदापूर प्रतिनिधी: श्रद्धेय योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आज इंदापूर येथील स्थायी वर्गामध्ये गुरुपौर्णिमा जवळजवळ २२७ साधकांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम योग साधना होम हवन गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे भजन त्याचबरोबर गुरु शिष्य परंपरा गुरु महत्त्व इत्यादी बाबत गुरुजनांचे मार्गदर्शन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांच्यामार्फत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या श्री वीरेंद्र गलांडे सर या आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला . ज्याप्रमाणे पंढरपुरात आषाढी वारी निमित्त वैष्णवांची मांदियाळी फुलून गेली होती अगदी त्याच धर्तीवर आज शहा सांस्कृतिक भवन येथे योग साधकांची मांदियाळी गुरु पौर्णिमेचे खास आकर्षण ठरली बहुसंख्येने महिला व पुरुष भगिनी उपस्थित होते विधिवत होम हवन व योग साधना श्री मदन चव्हाण यांनी केले गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करणारे भजन श्रीमती रोहिणी दळवी सौ मायाताई विंचू सुनिता गलांडे यांनी गायले या भजनामधून सर्व साधक मंत्रमुग्ध झाले होते कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पतंजली योग परिवारातील सर्व पुरुष व महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री दत्तात्रय अनपट व श्री शहाजी बोराटे यांनी मानले कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थित साधकांना श्री दत्तात्रय बोराटे यांच्याकडून प्रसाद वाटप करण्यात आले

