पुणे:-
"भोसरी, पुणे येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत"गुरुपौर्णिमा" संस्कारक्षम उपक्रम साजरा करण्यात आला.
आषाढ शुद्ध पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडील यांच्याबरोबर गुरूंनाअदराचे स्थान दिले जाते. या पार्श्वभूमीवर आजही मोठ्या उत्साहाने "गुरुपौर्णिमा" साजरी केली जाते.
ज्ञानाचा सागर असले गुरु शिष्यांना उद्देश आणि ज्ञान देतात त्यागुरूंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी गुरुपूजन केले जाते.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी सकाळी ९:०० ते १०:०० या वेळेत "गुरुपौर्णिमा" हा संस्कारक्षम कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर गुरूंच्या महात्म्याची जाणीव व्हावी, भक्ती शक्ती, विनम्रता, प्रामाणिकपणा, सहनशीलता, त्याग, आज्ञाधारकपणा, सेवा हे गुण रुजावेत ,आई, वडील,शिक्षक यांच्या विषयी कृतज्ञता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुरुवात गुरु प्रतिमेचे पूजन आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!!"या प्रार्थनेने करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष: सौ. उज्वला थिटे (संचालिका नारायण हट शिक्षण संस्था) या होत्या. तर मार्गदर्शक म्हणून: सायली संत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक: सौ.मीनल पाटील यांनी केले तर आभार: सौ.प्रतिभा तांबे यांनी मांनले.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका:सायली संत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना"गुरु हा सर्वश्रेष्ठ असून प्रत्येक व्यक्ती गुरुच्या मार्गदर्शन खाली घडतअसतो प्रत्येकाने आपल्या आई वडील मातापिता व शिक्षकांचा आदर केला पाहिजे. असा उपदेश विद्यार्थ्यांना केला.
गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांची मनोगते संपन्न झाली. शिक्षण संस्थेच्या वतीने शाळेतील शिक्षकांचा गुलाबपुष्प श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या आई-वडिलांचे मोठ्या व्यक्तींची दर्शन/ वंदन करण्याची संस्कार/शिकवण दिली जाते. व ती पाळली जाते.
कार्यक्रमाचे संयोजन: प्राचार्य,
विजया चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, मीनल पाटील सायली संत, प्रतिभा तांबे , नूतन मोहिते, तेजल पावडे ,उज्वला भुजबळ, अश्विनी वायकर, सुप्रिया राजगुरू,प्रवीण भाकड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी नारायणहट शिक्षण संस्थाचे सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, अध्यक्ष संदीप बेंडुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले.
नारायण हट टशिक्षण संस्थेची शाळा ही शिक्षणाबरोबर संस्कार करणारे केंद्र बनत असून त्यासाठी परिसरात अल्पावधीत प्रसिद्धीस येत आहे.

