अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी खंबीरपणे शरद पवारांच्या पाठीशी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी खंबीरपणे पाठीशी उभा राहणार असून बंड केलेल्या आमदारांचा व भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हा समन्वयक प्रा.सिताराम काकडे, सरचिटणीस प्रकाश पोटे, उपाध्यक्ष किसनराव लोटके, आरिफभाई पटेल, तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले, डॉ.राम कदम, रामदास ससे, रामेश्वर निमसे, दिगंबर जरे, पापामिया पटेल आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रा.सिताराम काकडे म्हणाले की जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी घटना घडली ही भाजप सरकारसाठी निंदनीय असून निषेध व्यक्त करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टांचा पक्ष असल्याचे सांगितले होते व आता पक्षातून काही आमदार घेतले व त्यांना पवित्र करून घेतले म्हणजे त्यांच्याकडे जे गेले ते पवित्र झाले असे असल्याने कुठलाही फरक पडत नसून आम्ही सर्व पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगीतले तर प्रकाश पोटे म्हणाले की महाराष्ट्रातील जे आमदार शरद पवारांच्या निगडित होते त्यांनी शरद पवार यांच्याशी व त्यांच्या विचाराशी बंड करून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला त्या सर्व बंडखोर,आमदारांचा निषेध नोंदवून शरद पवार यांना पाठिंबा देण्यात आले व लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न बंद करून जनतेतून निवडणुका घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे..

