shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुपौर्णिमेनिमित्त पतंजलि कडुन होमहवन सह योगसाधना.

गुरुपौर्णिमेनिमित्त पतंजलि कडुन होमहवन सह योगसाधना.
इंदापूर प्रतिनिधी:  पतंजलि योग समिती इंदापूरच्या वतीने नगरपालिकेजवळील शाळा नं १ व २ येथील स्थाई योगवर्गामध्ये  पहाटेच्या भक्तिमय वातावरणात  योगगुरु स्वामी रामदेवजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत  होमहवन योगसाधनेसह संगीतमय वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. 
 गुरु शिष्यांची परंपरा जपणारी गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.निरोगी  निरामय जीवनासाठी योगअभ्यासाचे मोफत शिक्षण देणार्‍या योगशिक्षकांचा यावेळी सर्व साधकांच्या वतीने यथोचीत सन्मान करण्यात आला.

यावेळी योगशिक्षिका वर्षा ननवरे यांनी आपल्या मनोगतामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले तर रतन वणवे यांनी भजनामधुन गुरुंप्रती समर्पण व्यक्त केली. डाॅ विक्रम पोतदार यांनी होमहवनचे पौरोहित्य केले.तर प्रशांत गिड्डे  यांनी योगसाधना घेतली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग समितीचे तहसिल प्रभारी मल्हारी घाडगे रविंद्र परबत बिभिषण खबाले किसान प्रभारी चंद्रकांत देवकर, काशिनाथ पारेकर,किसन पवार,युवा सहप्रभारी अभिजीत देवकर शरद झोळ,गणेश शिंदे सुनिल कांबळे आण्णासाहेब चोपडे हमीद आतार,भालचंद्र भोसले यांनी प्रयत्न केले.
close