shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आजच्या तरुणाईकडे सामाजिक जाण आणि भान असली पाहिजे -प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे

आजच्या तरुणाईकडे सामाजिक जाण आणि भान असली पाहिजे -प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे
इंदापूर प्रतिनिधी: श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर आणि मालोजीराजे निंबाळकर सामाजिक प्रतिष्ठान सणसर यांच्या संयुक्त विद्यामाने मालोजीराजे निंबाळकर यांच्या स्मृतिदिना निमित्त रेव्हरंड हरिभाऊ वाघमोडे प्रतिष्ठानचे बोरी बाल विकास आश्रम बोरी येथे cविद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे  वाटप करण्यात आले. बाल विकास केंद्र परिसरात श्री छत्रपती सहकारी  साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबरच अल्पोपहराचे वाटप करण्यात आले.
यावेळी रेव्हरंड हरिभाऊ वाघमोडे प्रतिष्ठानचे  डॉ.सीमा वाघमोडे व श्री शिरीष वाघमोडे यांनी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची मुले - मुली आणून सामाजिक बांधिलकीने  त्यांचे संगोपन व पालकत्व घेऊन त्यांचा उत्तमरीत्या सांभाळ करत आहेत.मानवतेला प्रमाणभूत मानून क्रियाशील काम करणारे  सौ. सीमा आणि श्री शिरीष वाघमोडे दांम्पत्य यांनी सामाजिक बांधिकीने हाती घेतलेले कार्य माणुसकी अन् मानवतेला खऱ्या अर्थाने सलाम कारणारं आहे.त्यांच्या या कार्याची दखल राज्य पातळीपासून देश पातळीपर्यंत व आंतरराष्ट्रीय पातळीरती घेतली आहे.
     समाजाने दुर्लक्षित केलेल्या  घटकातील या मुलांमध्ये आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. यावेळी सीमा वाघमोडे यांनी आपल्या मनोगतात बालविकास केंद्र आणि रेव्हरंड हरिभाऊ वाघमोडे प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती देताना या मुलांना समाजाने आपुलकी अन् प्रेम देणं खूप गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं.
        श्री छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी आजच्या तरुणाईने डोळसपणे पुढे येऊन सामाजिक बांधीलकीने समाजानं दुर्लक्षित केलेल्या घटकाकडे पाहणं गरजेचं आहे. बोरीच्या या माळरानावरती  सीमा व शिरीष वाघमोडे दांपत्याने सामाजिक जाणिवेतून व  सामाजिक बांधिलकीने हाती घेतलेले कार्य खूप मोठे आहे. आजच्या तरुणाईने याकडे गांभीर्याने पाहायलं पाहिजे. सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासताना सामाजिक जाण भान असणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळासाहेब पाटील होते. ते बोलताना म्हणाले,रेव्हरंड हरिभाऊ वाघमोडे प्रतिष्ठानच्या वतीने या बाल विकास केंद्राच्या माध्यमातून चाललेले कार्य आमच्या बोरी गावासाठी आदर्शवत व भूषणावह आहे.यावेळी श्री छत्रपती कला वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर आणि रेव्हरंड हरिभाऊ वाघमोडे सामाजिक प्रतिष्ठान बाल विकास केंद्र बोरी यांच्याशी 5 वर्षाचा सामंजस्य करार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर संजय मोरे यांनी केले तर आभार प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी मानले.यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर,महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी - विद्यार्थिनी, प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी,मालोजीराजे निंबाळकर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे विक्रमसिंह निंबाळकर, योगेश शेलार सागर गुप्ते, अमर निंबाळकर आणि बाल विकास केंद्राचे 42  विद्यार्थी उपस्थित होते.
close