आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले गुरू आहेतच परंतु समाजातील लहान थोर मंडळी सुद्धा आपले गुरु असतात - धनंजय रणवरे .
एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे गुरु पौर्णिमा उत्साहात.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी स्वीकारले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे उर्फ पप्पू पाटील उपस्थित होते. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य े चंद्रकांत गोपालराव रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात सर, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे सर ज्येष्ठ शिक्षक प्रमोद ज्ञानदेव चव्हाण सर, उपस्थित होते.
त्यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील व हायस्कूल मधील अनेक विद्यार्थ्यांनी गुरु विषयी आदर युक्त मनोगते व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाचे अध्यापक वैभव हणमंते सरांनी आजच्या जीवनात गुरुचे महत्व पटवून दिले.
माध्यमिक विभागामधील सोमनाथ चौधर सर, प्रमोद चव्हाण सर, पर्यवेक्षक खरात सर, प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना आदर्श गुरूंची लक्षणे स्पष्ट करून सांगितले.
आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले गुरू आहेतच परंतु समाजातील लहान थोर मंडळी सुद्धा आपले गुरु असतात. निसर्ग आपला गुरु आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने वडीलधारी मंडळींचा सन्मान ठेवला पाहिजे व त्यांचा आदर्श घेतला पाहिजे तरच आपले जीवन यशस्वी होत असते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा बरोबर वक्तृत्व स्पर्धेत देखील सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे असे मत संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन संस्कृतीक विभागाने केले. कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनी प्रणाली माने व अल्फीया मुलानी यांनी सूत्रसंचालन केले व अभिजीत वाघमोडे या विद्यार्थ्याने आभार प्रदर्शन केले.

