प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : ३ / नगर शहरातील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर महाजन गल्ली अहमदनगर आयोजित गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अनुसरून गुरुवंदन- भक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन सकल जैन श्रावक श्राविका यांच्या सहकार्याने रविवार दि. रोजी उत्साहात आनंदात व जल्लोषात करण्यात आले.
या कार्यक्रमात तब्बल ३७ गायकांनी भक्तीगीते, पोवाडा यांचे उत्कृष्ठ सादरीकरण केले .
कार्यक्रम यशस्वीतेकरिता योगेश चौधरी,अजय गंगवाल, कौशल पांडे, कुबेर प्रथमशेट्टी, वर्धमान युवासंघाचे कार्यकर्ते श्री. डेरे, श्री. गोसावी, श्री . शिरिष बेगडे यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमात सविता गंगवाल, रचना छडीवाल, मोनिका बाकलीवाल, मीना, रिना, राखी, राणी जैन यांनी पोवाडा सादर केला .तबला वादक कल्पेश अदावंत, पेटी वादक प्रणव देशपांडे यांनी मोलाची साथ दिली.
सूत्रसंचालन सौ. निता भाळवणकर यांनी केले तर आभार श्री. शिरीष बेगडे यांनी मानले .

