इंदापुर हिंदी अध्यापक संघाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र रणमोडे याची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: वार शनिवार दि ८ जुलै २०२३ रोजी केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे जिल्हा कार्याध्यश उस्मान मुलाणी याच्या अध्यक्षतेखाली हिंदी अध्यापक सभेची वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये नूतन कार्यकारणी निवड़ करण्यात आली. यावेळी राजेंद्र सर्जेराव रणमोडे सर यांची इंदापूर तालुका हिंदी अध्यापक सभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री उसमान मुलाणी सर पुणे जिला समन्वयक श्री सुधाकर भोंग,माजी अध्याक्ष श्री शब्बीर मुलाणी,सचिव श्री किसन भोंग श्री चव्हाण सर मुख्याध्यापक श्री शेंडे सर हजर होते या वेळी वर्ष 2023/24 कामाचे हिंदी विषयाचे नियोजन नुतन अध्यक्ष श्री रणमोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
अध्यक्ष निवडीचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निरा भिमाचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील , शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील सचिव, किरण पाटील तसेच लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आवारे सर यांनी रणमोडे सर यांचे अभिनंदन केले .

