निमगाव केतकी येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचेनिमगाव केतकी येथे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात सुरूवात.
सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची सुवर्ण संधी.
इंदापूर प्रतिनिधी: दि १० श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्या निमित्त सालाबादप्रमाणे निमगाव केतकीच येथील संत सावता महाराज मंदिर येथे परिसरातील परमार्थ प्रेमी भाविक ,वारकरी संप्रदाय महाराज व भजनी मंडळी सर्वाचे उपस्थिती अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात सुरूवात झाली. यावेळी श्री संत सावता महाराज , विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची विधीवत पुजा करून , वीणा , गाथा व ध्वज पुजन करून अखंड हरिनाम सप्ताह सुरूवात करण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहात प्रकाश महाराज दंडे , सुखदेव महाराज ननवरे , चांडाळ चौकडी फेम भरत उर्फ बाळासाहेब महाराज शिंदे , चैतन्य महाराज बारवकर , फरांदे महाराज , बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत , शामसुंदर महाराज ढवळे , फुलाचे किर्तन श्रीराम महाराज अभंग , काल्याचे कीर्तन छोटे माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे होणार आहेत. सप्ताह सोहळ्यात आठ दिवस मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येते अशी माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग हेगडे यांनी दिली.
संजय राऊत सर व सौ ह भ प सुनिता राऊत मॅडम यांचे वतीने संत सावता महाराज यांचे चरणी चांदीच्या पादुका त्याचप्रमाणे चांदीचे आवरण असलेले चौरंग व दोन पाट भेट देण्यात आले. उत्सव कमिटी वतीने गोरख आदलिंग , रतन हेगडे , बबन खराडे , माणिक भोंग व ग्रामस्थ यांचेवतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ कीर्तनकार ह भ प बापूसाहेब मोरे महाराज , पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ , उत्सव कमिटी सर्व पदाधिकारी , निमगाव केतकीचे सर्व युवक , महिला , जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

