सुमीत जोशी याचा 79.78 गुणांसह दुसरा क्रमांक
प्रतिनिधी : संजय वायकर
कोळपा : ११ / गौंडरे तालुका करमाळा येथील मूळ रहिवासी कमलाकर (काका) गजानन जोशी यांचा मुलगा सुमीत हा एम सी ए पदव्यूत्तर पदवी मध्ये महाविद्यालयातून दुसरा आल्याबद्दल दि . 10 .07. 2023 रोजी श्री . व्हि डि देशमुख कॉलेज ऑफ एमसीए, कोळपा येथे त्याचा सत्कार करण्यात आला .
यावेळी गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोळपा चे प्राचार्य डॉ. राहुल सोळुंके सर संस्थेचे सहसचिव माननीय राहुल केवळराम सर श्री व्ही डी देशमुख कॉलेज ऑफ एमसीए च्या प्राचार्या माननीय प्रतीक्षा बेंबळकर मॅडम , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आणि इतर गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा सलग्नित श्री गोविंद प्रभू ग्रामीण व शहरी विकास सेवाभावी संस्था द्वारा संचलित श्री व्ही. डी. देशमुख कॉलेज ऑफ एमसीए येथे एम सी ए पदव्युत्तर पदवी मध्ये चि. सुमित जोशी हा 79.78 गुणांसह महाविद्यालयात द्वितीय आल्या बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. .

