shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा केला सन्मान

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेमधील  यशस्वी विद्यार्थ्यांचा केला सन्मान
 
     इंदापूर प्रतिनिधी: युपीएससी(UPSC), एमपीएससी (MPSC) तसेच बँकिंग क्षेत्रातील परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दि.9 जुलै रोजी भाग्यश्री बंगलो येथील निवासस्थानी केला.
      यूपीएससी (UPSC) परीक्षेत तुषार शिंदे यांनी यश संपादन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पीएसआयपदी करिष्मा महादेव वणवे, अभिजीत दत्तात्रय ढेरे, रणधीर काशिनाथ रोकडे, ज्योती नारायण शिंदे, जयसिंग बाळासाहेब भाळे, विजय सुरेश महाडिक यांनी यश संपादन केले. आरबीआय(RBI) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शिवानी भाऊसाहेब वाकळे उत्तीर्ण होऊन असिस्टंट मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
    इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आपले आई-वडील तसेच मार्गदर्शक शिक्षक आणि तालुक्याचे नाव करून इंदापूर तालुक्याचा स्पर्धा परीक्षेतील यशस्वी होण्याचा गुणात्मक असा पॅटर्न तयार केला आहे असे मत यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद करताना व्यक्त केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले.
  यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
close