shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील गुणवंताचा सन्मान...!

अहमदनगर - । प्रतिनिधी।
      आपल्या क्षेत्रात मिळालेल्या प्राविण्याचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे.आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना  आपल्या मातीला,आई-बाप,शाळेला  विसरु नका. धावपळीच्या जीवनात कधी कोणता मोह होईल हे सांगता येत नाही. भावी आयुष्यात कोणत्याही अमिशाला बळी पडु नका असा मौलिक सल्ला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डाॅ.विश्वासराव आरोटे यांनी दिला.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाचे वतीने डोंगरगांव येथील तीन सनदी लेखापाल विद्या विश्वनाथ उगले, ज्ञानेश्वर दशरथ उगले, गणेश पोपट उगले, महाराष्ट्र सेवा आयोगातुन झालेले पोलिस उपनिरीक्षक आकाश गोरक्ष नेहे व अकोले येथील फॅकल्टी ऑफ पाॅलीटेक्निक विद्यार्थ्यांनी आदीती जगन्नाथ आहेर हिने सिव्हील इंजिनियरिंग, अमृतवाहिनी कॉलेज मधील प्रियंका राजेंद्र उगले हिने एम फार्म प्रथम क्रमांक मिळून विशेष प्राविण्य  मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने  सन्मान करण्यात आला.

  श्री. आरोटे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेले एकविस वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांच सन्मान करत असतो.इतर बहुतेक राज्यात व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 

       यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोकराव उगले, उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, संपर्क प्रमुख जगन्नाथ आहेर, लिंगदेव ग्रामपंचायत सदस्या सौ.कल्पना फापाळे आदी उपस्थित होते.
close