प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २२ / चास येथील सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मधील सिव्हिल , कॉम्प्युटर , इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी उत्तम आणि अतिउत्तम श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या देखरेख समितीने महाविद्यालयात १९ एप्रिल २०२३ रोजी भेट दिली व त्या अंतर्गत महाविद्यालयाचे बाह्य परीक्षण करण्यात आले . यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अध्यापन , अध्ययन , प्रयोगशाळा व त्यातील उपकरणे , नवीन उपक्रम , विद्यार्थ्यांची प्रगती , प्रशासकीय बाबी , विद्यार्थ्यांशी संवाद आणि संस्था स्तरावरील शैक्षणिक कामकाजाची पाहणी करण्यात आली . प्राचार्य आर . एस . गडाख यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी माहिती समितीस सादर केली .
त्यानुसार दि . २०जुलै २०२३ रोजी आडसूळ पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाला अतिउत्तम श्रेणी तर सिव्हिल , कॉम्प्युटर विभागाला उत्तम श्रेणी प्राप्त झाली . याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध आडसूळ, सचिव लीनाताई आडसूळ, उपाध्यक्ष श्री विश्वनाथ आडसूळ संचालक कु. कृष्णा आडसूळ आणि संचालक मंडळ, यांनी प्राचार्य रमेश सूर्यभान गडाख, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री . रमेश गडाख यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

