प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २२ / नगर शहरातील निर्मल नगर या उपनगरात पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणात मोरे आणि खामकर यांचे घरी अनेक ब्रह्मकमळ उमलले आहेत .
श्रावणाच्या आगमनाचे स्वागत या ब्रह्म कमळांनी मोठ्या मनमोहक स्वरूपात केल्याचे दिसून येत आहे . हे फूल महादेवाला प्रिय असुन याचा फक्त पावसाळ्यातच बहर दिसुन येतो.
या प्रसंगी गाडेकर चौकातील मोरे आणि खामकर कुटुंबाने विधिवत पुजा करून ब्रह्मकमळाचे स्वागत केले . विशेषतः पावसाळ्यात ही फूले उमलताना दिसतात.
यावेळी मुकुंद मोरे ,भाऊसाहेब मोरे , सुचिता मोरे ,सुनंदा खामकर ,अशोक खामकर , महानंदा खामकर, पद्माबाई खामकर, अभिषेक खामकर आदी उपस्थित होते .

