संपूर्ण भारतात होत आहे निषेध
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २० / कर्नाटक मध्ये जैन मुनी आचार्य श्री कामकुमार नंदी गुरुदेव यांची निर्घृणपणे हत्या झाली होती . त्याचा निषेध व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण भारतात आंदोलन सुरू आहेत . अहमदनगर येथे सदर घटनेचा निषेध म्हणुन गुरुवार दि . २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगर सकल जैन समाजाचे वतीने भारत बंद ची हाक देवुन नगर शहरातील जैन मंदिर पासून ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मुक मोर्चा काढुन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.
जैन आचार्यश्री कामकुमारनंदीजी यांना ५ जुलै रोजी निरंकार उपवास असताना समाज कंटकांकडुन रात्री अपहरण करून इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले आणि त्यानंतर शरिराचे तुकडे तुकडे करुन हत्या करून बोअरवेलच्या खड्ड्यात हे शरिराचे तुकडे करून टाकण्यात आले .सदर प्रकरण जैन समाजासाठी अत्यंत निंदनीय आहे आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून अहमदनगरचा प्रत्येक जैन पुरूष महिला युवक युवती अबाल वृद्ध मोर्चात सहभागी झाले होते .
यावेळी निवेदन दिल्यानंतर सर्व समुदाया मार्फत मोर्चाची सांगता मुनिश्रींना मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली.
या निषेध मुक मोर्चा मध्ये जैन समाजाच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले .
जैन श्रावक संघ धार्मिक परीक्षा बोर्ड ,जैन ओसवाल पंचायत सभा ,बडीसाजन श्री संघ ,
संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर कापड बाजार , दिगंबर जैन समाज , सारसनगर जैन स्थानक , विनायकनगर जैन स्थानक ,वर्धमान जैन स्थानक, भिंगार, महावीरनगर जैन स्थानक ,बोल्हेगाव जैन स्थानक ,नवीपेठ जैन स्थानक , युवक संघटना ,जैन ओसवाल युवक संघ ,बडीसाजन युवा संघ ,वर्धमान युवा संघ , धर्मचक्र युवक मंडळ ,
सिमधंर स्वामी धर्मचक्री भक्ती मंडळ , सकल राजस्थानी युवा मंच ट्रस्ट ,राजस्थानी युवा संघठन ,जय आनंद फाऊंडेशन ,जय आनंद महावीर युवक मंडळ ,महावीर प्रतिष्ठान ,अहमदनगर मर्चन्टस बँक ,सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्था ,बडीसाजन क्रेडीट सोसायटी आदी जैन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन सकल समाजाची ताकद शासनास दाखवून दिली आहे .

