महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चा ६१ वा वर्धापनदिन कौठळी शाळेत साजरा...
वर्धापन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना सुलेखन वही वाटप--स्तुत्य उपक्रम
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २२ जुलै महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६१ वा वर्धापन दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य देवून साजरा करण्यात आला.
शाळेतील १ ली मध्ये नव्याने दाखल झालेल्या मुलांना सुलेखन वही वाटप करण्यात आली.त्या वही मध्ये भाषा,गणित,इंग्रजी, चित्रकला असे विषय अंतर्भूत आहेत.त्या वह्यांमधील कृती शाळेतच अक्षर गटाप्रमाणे, अंक,लेटर प्रमाणे सोडवून घेण्याचे ठरले.सदर कार्यक्रमास इंदापूर शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे,अमित भोंग,आरती गायकवाड सह विद्यार्थी उपस्थित होते.

