श्रीरामपूर प्रतिनिधी:
नव स्वराज्य सेना या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त येथील कर्मवीर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नवस्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विजयराव खाजेकर, विधी सल्लागार ॲड.अण्णासाहेब मोहन आदींची भाषणे झाली,
यावेळी ॲड. विजयराव खाजेकर म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे आपल्या तेजाने प्रकाशित करणारे ज्ञानसूर्य होते. त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापिली व मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू करून मोठे काम केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे ते म्हणत. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव व समता यांचे संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांना दिले, ते म्हणत माझ्या दाढी जितके केस असतील त्यापेक्षा शतपटीने मी मुले आणि मुली शिकून तयार करणार व समाज शोषण करणाऱ्याच्या छाताडावर थैयथैय नाचायला लावणार आणि म्हणूनच आजही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कार्य करून लाखो विद्यार्थी देशसेवेसह समाज प्रबोधनाचे काम करत आहे.
या कार्यक्रमास नव स्वराज्य सेनेचे उपाध्यक्ष संजय वाहुळ, संपर्कप्रमुख भाऊसाहेब खरात, विधी सल्लागार ॲड.अण्णासाहेब मोहन, ॲड. डी.एस वानखेडे, रवी गरेला ,युवक अध्यक्ष संदीप तोडकर ,कार्याध्यक्ष राजूभाई जहागीरदार, महिला संपर्कप्रमुख सौ. शशिकलाताई मोहन, महासचिव मुस्ताकभाई शेख , संघटक सचिव जसपालसिंग सहानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

