shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची इंदापुरातून सवाद्य

कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची इंदापुरातून सवाद्य* मिरवणूक*
   इंदापूर प्रतिनिधि: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ जयंती आज रयत शिक्षण संस्थेचे सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूरच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम विद्यालयांमध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य प्रदीप गारटकर, विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस,डॉ श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, दादासाहेब सोनवणे,अशोक मखरे,राजेंद्र चौगुले,बाळासाहेब व्यवहारे, मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे ,माजी मुख्याध्यापक भीमराव वनवे, घाडगे, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव, छाया जाधव,पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील जाधव, रेश्मा शेख तसेच अनेक माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बसवलेले  झांज पथक, लेझीम पथक, टिपरी नृत्य इत्यादी कलाप्रकार सादर करत वाजत गाजत विद्यालयातून रामवेस -पोरा पोरांची चावडी -आंबेडकर नगर- कासारपट्टा- नेहरू चौक- खडकपुरा- नगरपालिका- ४० फुटी रोड- दर्गा मज्जित चौक- संभाजी चौक या मार्गे  मिरवणूक काढण्यात आली .विविध ठिकाणी माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या वतीने कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी घोषणा देत इंदापूर शहर दमन सोडले.अनेकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट गोळ्या वाटप केले कै.धनंजय बापू वाशिंबेकर मेमोरेबल ट्रस्टच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊनचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यालयाच्या वतीने रुचकर स्नेहभोजन देण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध व शांततेत मिरवणूक संपन्न झाली. यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मेहनत घेऊन मिरवणूक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
close