श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा वाढदिवस अशोक उद्योग समूहात तसेच अंधशाळा, मुकबधिर विद्यालय व माऊली वृध्दाश्रमास देणगी देवून तसेच विविध उपक्रम राबवून कोणताही गाजावाजा न करता साजरा करण्यात आला. माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी आपल्या वाढदिवशी कोणतेही प्रदर्शन न करण्याचे तसेच हारतुरे, बुके, फ्लेक्स बोर्ड, जाहिराती आदिंना फाटा देण्याचे आवाहन केले होते. स्वतः श्री.मुरकुटे यांनी नॅशनल स्कूल ऑफ ब्लाईंडस, मुक बधिर मुलांचे विद्यालय, माऊली वृध्दाश्रम, अशोक इंग्लिश स्कुल,अशोक आयडियल स्कुल, भोकर, वडाळामहादेव, टाकळीभान प्राथमिक शाळा येथे भेटी देवून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.
अशोक पॉलिटेक्निक कॉलेज व अशोक कॉलेज ऑफ फार्मसी यांचे संयुक्त विद्यमाने आधार ब्लड बँक, संगमनेर व हेल्थ केअर लॅबोरेटरी, अशोकनगर यांचे सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ३० व्यक्तींनी रक्तदान केले. तसेच श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक किशोर बनसोडे यांनी माऊली वृद्धाश्रम येथे अन्नदान केले. भारत राष्ट्र समिती पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष गणेश छल्लारे यांनी भोकर येथे ५१ अपंग व्यक्तींचा दोन लक्ष रुपयांचा मोफत विमा उतरविला आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे व वह्यांचे वाटप केले.
टाकळीभान येथे लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व वृक्षारोपण केले. अशोक कारखान्याचे संचालक रामभाऊ कासार यांनी वडाळामहादेव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे व वह्यांचे वाटप केले. गणेशसिंग व संकेत संचेती मित्र मंडळाचे वतीने अशोक बँक परिसर येथे दिव्यांग गरजवंत व भागातील नागरिकांसाठी मोफत नागरिक सुरक्षा पॉलिसी वाटप करण्यात आले. सदर पॉलिसी एक लाख रुपये विम्याची असून अपघाती हॉस्पिटल खर्च विमा २० हजारापर्यंत विमाधारक नागरिकांना मिळणार आहे.
अशा विविध ठिकाणी संपन्न झालेल्या वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, जि. प. बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष सौ.इंदुताई डावखर, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या समन्वयक सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, संचालक भाऊसाहेब उंडे, रामभाऊ कासार, दत्तात्रय नाईक, बाजार समितीचे संचालक किशोर बनसोडे, मयूर पटारे, नॅबचे अध्यक्ष ॲड्.बी.एफ.चुडीवाल, ॲड्.सुहास चुडीवाल, ॲड्.राठी, अशोक महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड, भारत राष्ट्र समितीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष गणेश छल्लारे, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, सौ.शालिनीताई कोलते, शिवाजी शिंदे, बापूराव त्रिभुवन, विलास दाभाडे, बाबासाहेब बनकर, रोहन डावखर, संजय रणनवरे, अप्पासाहेब रणनवरे, नानासाहेब मांढरे, मनोज आगे, प्रा.जोशी, प्रा.साळवे, आशिष दोंड, संदीप डावखर, अमोल कोलते, विशाल धनवटे, ऋषिकेश बनकर, गणेश सिंग, संकेत संचेती, बाळासाहेब शिंदे, उद्धव आहेर, कैलास भागवत, नारायण बडाख, शिवाजी मुठे, रामदास बनसोडे, सोपानराव पठाडे, रामनाथ सांगळे, दादाभाऊ गोरे, मधुकर बनसोडे, संदीप बनसोडे, विजय बनसोडे, राजेंद्र बनसोडे, सुनील बनसोडे, नारायण मुठे, अशोक मुठे, उमेश भुतेकर, राजूभाई नब्बू, ज्ञानेश्वर सांगळे, तात्या वर्पे, शंकरराव वर्पे, जानू बनसोडे, अशोकराव बनसोडे, शिवनाथ आव्हाड, दिलीपराव बनसोडे, अजय वाघचौरे, मनोज चिंतामणी, बाबुराव मात्रे, श्रीमंत भोसले आदी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबीर यशस्वी होणेसाठी आधार ब्लड बँकेचे प्रदीप जाधव, दिव्या बंटे, रुपाली कुंभारे, सिमरन चौरे, मंगेश आगवले, शुभम राऊत यांनी परिश्रम घेतले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - 9561174111

