बी.आर.चेडे - शिरसगांव
श्रीरामपूर - भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भाग विधवा निराधार महिला, अनाथ निराधार मुलं ,असंघटित कामगार यांच्यासाठी अनमोल कार्य करणारी म्हणून भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना झाली. आज गणेश चतुर्थी निमित्त संस्थेच्या जागतिक स्वरूपाच्या वेबसाईटचे अनावरण भारतीय लष्कर सेवेचे कॅप्टन कर्नल .जे.के.अरविंद कुमार  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


 यावेळी उपस्थित.एअर फोर्स अधिकारी अमित कुमार दुबे, कॅप्टन एस.बी.सिंग,भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार,ओ.सी.ए च्या संचालिका सौ. दुबे,सौ.अनिता पवार आदि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत वेबसाईटचे आज गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेशाने अनावरण करण्यात आले.


 याप्रसंगी भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वेबसाईटचे बाहेरच्या देशातही आज एकाच वेळी अनावरण करण्यात आले. भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद आणि गौरवस्पद आहे.संस्थेचे कार्य आज महाराष्ट्र पुरतेच मर्यादित नव्हे तर  परदेशात देखील पोहचले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.या संस्थेला सातत्याने विविध स्तरावरून सहकार्य आणि मदत होण्याची गरज आहे असे महत्वपूर्ण उद्गार भारतीय लष्कर सेवेचे कॅप्टन जे.के.अरविंद कुमार यांनी व्यक्त केले.यावेळी .एअर फोर्स अधिकारी डॉ.अमित कुमार दुबे व कॅप्टन एस.के सिंग यांनी देखील शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचबरोबर भूमी फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी देखील भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या कार्याचा अहवाल प्रदर्शित करत संस्थेच्या भविष्यातील कल्पनांचा विचार मांडला.यावेळी परदेशातून देखील शुभेच्छांचा वर्षाव झाला. संस्थेला सातत्याने सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार यांनी आभार मानले.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111