shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांगले कार्य आणि चांगली पुस्तके ही जगण्याची खरी श्रीमंती होय = उत्तमराव दाभाडे



श्रीरामपूर प्रतिनिधी:
माणूस हा चांगलाच आहे. त्याचे विचार,आचार शुद्ध राहिले की माणुसकीचे वलय लाभते, त्यासाठी चांगले कार्य आणि चांगली पुस्तके सोबत असली की जीवनातली खरी श्रीमंती होय,ती      अनुभवण्यास मिळणे हीच जीवनज्योत होय असे विचार सेवानिवृत्त नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे यांनी व्यक्त केले. 
येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आदर्श माजी नायब तहसीलदार तथा सध्या टिळकनगर येथील शेती महामंडळाचे व्यवस्थापक आणि सामाजिक विचारकार्य हाती घेतलेले सेवाभावी कार्यकर्ते उत्तमराव दाभाडे यांचा सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते.साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी उत्तमराव दाभाडे म्हणजे दीर्घकाळ नोकरी करताना सदैव  प्रामाणिक आणि निर्मळ मनाचे आदर्श पदाधिकारी कसे होते ते अनुभव सांगून उत्तमराव दाभाडे यांचा सत्कार केला तर सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सौ. शोभाताई दाभाडे यांचा सत्कार केला.सेवानिवृत्त एलआयसी अधिकारी फकिरा वाघमारे, सौ.सुनंदा वाघमारे यांनीही दाभाडे परिवाराचा सन्मान केला. श्रीमती सुलाबाई वाघमारे,शेवगाव बँकेचे अधिकारी आशिष वाघमारे, सौ.मनीषा वाघमारे आदिंनी उपक्रमाचे नियोजन केले. उत्तमराव दाभाडे व परिवारास डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी अनेक पुस्तके भेट दिली.त्यावर दाभाडे भाऊसाहेब म्हणाले, पुस्तके ही मस्तके घडवितात माणसे जोडतात आणि माणुसकीचा अर्थ सांगतात असे सांगून डॉ.बाबुराव उपाध्ये यांची वाचन संस्कृतीची चळवळ ही साहित्यसेवेची खरी जीवनप्रेरणा आहे, ही वाचन संस्कृती आजच्या मोबाईल संस्कृतीत अधिक वाढणे गरजेचे असल्याचे सांगून शून्यातून जीवन घडविणाऱ्य वाघमारे परिवाराचे कौतुक केले.जीवनात जे काही निर्मळ मनाने काम केले,तीच पुण्याई समाजात अनुभवण्यास मिळते , लोक मनापासून सन्मान करतात हीच समाधानरूपी संपत्ती जवळ असली की काहीच कमी पडत नाही असे आपल्या नोकरीतले काही अनुभव त्यांनी सांगितले.आशिष वाघमारे यांनी आभार मानले.


संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close