श्रीरामपूर प्रतिनिधी:
शिक्षणमहर्षी,पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ०४ ऑक्टोबर १९१९ रोजी' बहुजन हिताय बहुजन सुखाय'या ध्येयाने रयत शिक्षण संस्था स्थापन केली, अशा थोर चरित्र नायकाची १३६ वी जयंती शुक्रवारी येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांनी साजरी होणार असल्याची माहिती प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
सकाळी कर्मवीर पुतळा पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रतिष्ठान कार्यालयात कर्मवीर एक निरपेक्ष शिक्षणतपस्वी या विषयावर परिसंवाद होणार आहे.बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश मेहेकरकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे हे उपस्थित राहणार आहेत.प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे यांच्या द्वितीय स्मृतीप्रीत्यर्थ श्रीमती आशालता दिंगबर कल्याणकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कर्मवीर एक निरपेक्ष शिक्षणतपस्वी या विषयावर माजी प्राचार्य टी. ई. शेळके,प्राचार्य शन्करराव अनारसे व साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची व्याख्याने होणार आहेत.याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.राजीव रावसाहेब शिंदे, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, सदस्य सुदामराव औताडे पाटील आदिंनी केले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

