अपराध माझा असा काय झाला ...........कोण होता शिर्डीचा उच्चशिक्षित तरुण सौरभ पाटील ?वडील नंदलाल पाटील यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत वडील वारल्यानंतर आईने मजुरी करून एम ए बी एड पर्यंत शिक्षण दिले. शिर्डीच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात दहा वर्ष एक हजार रुपये पगारावर विनाअनुदानित तत्त्वावर नोकरी केली व सौरभच्या इच्छेनुसार त्यास सिविल इंजिनिअर बनविले नंतर परत त्याने एम टेक पूर्ण केले. एमटेक पूर्ण होण्याच्या दोन महिने अगोदरच तो कंपनीत जॉबला लागला .पहिल्या महिन्याच्या पगारात आई-वडील भावासाठी त्यांनी कपडे व भरपूर वस्तू आणल्या. सतत मोबाईल मध्ये मग्न असणारा सौरभ मित्रांशी अतिशय मिळून मिसळून वागायचा .प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने बोलायचा गळ्यात रुद्राक्षाची माळ असणारा सौरभ कसलंही व्यसन करत नसे.आयुष्यात दारू/ बिअरला कधी स्पर्श करणार नाही अशी शपथ त्याने वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून घेतली होती . पाऊने सहा फूट उंचअसलेला सौरभ सुंदर पर्सनॅलिटी असलेला उमदा तरून होता ,पण मनाने अतिशय  हळवा होता प्रेमाने दोन शब्द कोणी बोलले तरी त्यावर तो पूर्ण विश्वास टाकायचा .मित्रांशी कधीही घाणेरड्या शब्दात बोलत नसेल घरी वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने त्याने कधीही कुणाचे मन दुखावले नाही मोठे होऊन तो वडिलांना नेहमी म्हणायचा की, आपले गेलेले शेत आपण परत घेऊ .फोर व्हीलर गाडी घेऊन, पुण्यात आपला स्वतःचा फ्लॅट घेऊ ,साईला IAS बनवू ,आईवडिलांना विमानात फिरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सौरभचे  विमान अचानक भरकटले आणि नियतीच्या आघाताने कायमचे उडून गेले. वडील नंदलाल पाटील यांची नोकरी तीन वर्ष बाकी आहे .2004 पूर्वी नियुक्त असूनही 100% अनुदान नसल्याच्या कारणाने शासनाने जुनी पेन्शन नाकारली आहे, लहान भाऊ सातवीत शिकतो आहे ,आई-वडिलांचा आधार असलेला एमटेक तरून अचानक समाज व्यवस्थेतील विकृत जाळ्यात अडकतो. आज प्रत्येक आई वडिलांच्या मनात ही भीती तयार झाली आहे की एखाद्या चांगल्या मुलावर ,कुटुंबावर ही वेळ येत असेल तर मुलांना शिक्षण द्यावे की नाही ?कारण कमी शिकलेले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक एका उच्चशिक्षित तरुणाला सहज संपवितात आणि उजळ माथ्याने समाजात फिरतात .तेव्हा म्हणावेसे वाटते की अपराध माझा असा काय झाला........ दर्शना पवार आणि सौरभ पाटील यांच्या बाबतीत घडलेली घटना पाहता आपण कोणत्या दिशेला चाललेला आहोत याचा विचार होणं गरजेचं आहे...... ,धन्यवाद

                       नंदलाल पाटील..शिर्डी.