*महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदन
श्रीरामपूर प्रतिनिधी:
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटा येथे मराठा समाजावर झालेल्या अमानूष मारहाण घटनेच्या निषेधार्थ व मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सकल मराठा समाज श्रीरामपूरच्यावतीने श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यास श्रीरामपूर मर्चंट असो. तसेच विविध पक्ष व राजकीय संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
शहराच्या वॅार्ड क्र.२ सह संपुर्ण श्रीरामपूर शहर १००% बंद ठेवण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची महात्मा गांधी चौक येथे भेट घेतली, यावेळी सकल मराठा समाज श्रीरामपूरच्यावतीने ना.विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
*सहयोगी:
दीपक कदम - श्रीरामपूर
संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

