मोर्शी - आयुष्यमान भव: या योजनेचे अनावरण दि.13/09/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे मा.तहसीलदार साहेब यांचे अध्यक्षतेखाली तसेच वैद्यकीय अधिक्षक मा.डॉ.प्रमोद पोतदार सर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला.



         सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये वय वर्ष 18 व त्या वरिल सर्व पुरषाचे आरोग्य तपासणी करुन आवश्यक त्या चाचण्या, उपचार इ. मोफत मिळून देणे हा या मोहिमेचा एकमेव उद्देश आहे.                                            
           सदर योजनेअंतर्गत दि.17 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर 2023 या कालावधीत दर आठवड्याला शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये रक्तदान, मधुमेह,हृदयरोग,मुखाचा कर्करोग, हर्निया,हायड्रोसिल,नेत्र तपासणी,पोटाचे विकार,कैंसरचे निदनासाठी आवश्यक चाचण्या सोनोग्राफी, ईसीजी, एक्सरे, क्षयरोग निदान चाचण्या करण्यात येऊन 18 वर्षावरील सर्व पुरुषांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी केले आहे. सदर आयुष्यमान योजनेतील कार्ड नागरिकाना वितरित करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन कोरडे ,डॉ.मेघा झामडे, डॉ.पकंज मुळे तसेच सहायक अधिपरिचारीका रूत लोखंडे, मिनाक्षी वगारे जयश्री मोरे,  वैष्णवी जोशी, विद्या पाटिल,स्नहेल बेहरे आरोग्यसेविका कल्पना पंधरे ,भारती राऊत, पुष्पा पंधरे,अर्चना पवार आयुष्यमान व महात्मा फुले योजनेतील शेख वसीम, सुजाता पांडे, प्रकाश पांडे तसेच आरोग्य कर्मचारी म्हणून विनय शेलुरे ,सूजीत वानखडे, शेख युसूफ, प्रशांत बेहरे,अमोल झाड़े, विकार अहमद,आशीष नेरकर, स्वाती बुरंगे, कविता इंगोले या आहेत व कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड गर्दी असुन नागरिकाना डॉ.प्रमोद पोतदार सर यांनी मार्गदर्शन केले.