उपाध्यक्ष सिध्दार्थ मुरकुटे, सचिवपदी गणेश भाकरे तर युवक तालुकाध्यक्षपदी गणेश छल्लारे
श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारत राष्ट्र समितीची श्रीरामपूर तालुका कार्यकारीणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे सल्ल्याने नियुक्त करण्यात आल्याची माहिती भारत राष्ट्र समिती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी दिली.
यानुसार श्रीरामपूर तालुका समितीच्या तालुका उपाध्यक्षपदी सिद्धार्थ मुरकुटे, रसुल पठाण व नितीन खंडागळे, शहर अध्यक्ष नाना पाटील, सचिव गणेश भाकरे, खजिनदार रामभाऊ कसार आणि कार्यकारीणी सदस्य म्हणून दत्तात्रय नाईक, रामदास पटारे, महेश पटारे, कल्याण लकडे, वृद्धेश्वर कुऱ्हे, संकेत संचेती, विलास कदम, राहुल लिहीणार, शहाजी वडितके यांची निवड करण्यात आली. याबरोबरच श्रीरामपूर तालुका युवक समितीच्या तालुकाध्यक्षपदी किशोर उर्फ गणेश छल्लारे, तालुका उपाध्यक्ष दिपक काळे, विराज आंबेकर, सचिव आशिष दोंड, सहसचिव सुनील बोडखे तर कार्यकारीणी सदस्य म्हणून युवराज थोरात यांची निवड केली असल्याचे श्री.गलांडे यांनी सांगितले.
सदर नियुक्तीबद्दल माजी आ.भानुदास मुरकुटे, 'अशोक' चे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी, व्हा.चेअरमन भाऊसाहेब हाळनोर, मार्केट कमिटी संचालक मयूर पटारे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, किशोर बनसोडे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सभापती सौ.सुनीताताई गायकवाड यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

