एन ई.एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथील विद्यार्थ्यांनी घेतला भोंडला कार्यक्रमाचा आनंद.
इंदापूर प्रतिनिधि: निमसाखर  एज्युकेशन सोसायटीचे एन ई.एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
यावेळी संस्थेच्या वतीने  सौ .जयमाला नंदकुमार रणवरे, सौ.शैलजा संजय रणवरे, सौ दिपाली धनंजय रणवरे, सौ. राधिका हर्षवर्धन रणवरे सौ. रागिनी चंद्रकांत रणवरे कुमारी सिद्धी संजय रणवरे,या सर्व महिला भगिनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. जयमाला नंदकुमार रणवरे यांनी स्वीकारले होते. तर दिपाली धनंजय रणवरे यांनी प्रमुख अतिथी म्हणून होत्या. या कार्यक्रमाला मुलींचे अठरा विविध ग्रुप तयार केले होते. टिपऱ्या नृत्य, गर्बा नृत्य, दांडिया, देवीची विविध गाण्यांवरती  नृत्य केले. सौ आशा पर्वते मॅडम यांनी भोंडल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सवामध्ये भोंडला या कार्यक्रमाला आगळेवेगळे महत्त्व आहे असे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले. संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांच्या सौभाग्यवती सौ दिपाली धनंजय रणवरे यांनी या कार्यक्रमानिमित्त सर्व मुलींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी आत्मविश्वासाने व धाडसाने विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे असेही मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले. उपस्थित सर्वच महिला भगिनींनी कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व मुलींबरोबर कार्यक्रमाचा आनंद घेतला व कार्यक्रमाची शोभा वाढविली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य , पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, यांच्या मार्गदर्शनाखालीसौ. पर्वते मॅडम व सौ.पाटील मॅडम यांनी केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.