किती हसलो मी माझ्यावर...
मलाच रडतांना पाहिल्यावर.....
आहे अजुन वाट पाहतो काठावर
येते तुझेच नाव तरंगत ओठांवर...
तु म्हटली होतीस ह्या आभाळावर नाचु
अजुनही तसाच आहे शाबुत ह्या मातीवर....
माळले मी जे भेटले क्षण रचुन ठेवले अंतरी
झालो मी परत मालामाल उद्वस्त झाल्यावर...
झालो मी सुगंधी वाहतो चोहीकडे दरबदर
बहरला हा आकाश शब्दांचा मोहर आल्यावर...
कसे लिहु आयुष्या मी तुला कागदावर!
प्रत्येक वेदनेचा बोली लावुन निलाव केल्यावर....
काल भावना खुप रडली लाकडं पेटल्यावर...
काय माहीत जाळतात की पुरतात मेल्यावर....
हातावरच्या रेषांपेक्षा पोटातल्या भुकेचा आक्रोश आईकल्यावर...
धरतीचे झुंबर केले मी अंबरात पोहल्यावर...
आकाश....

