नगर प्रतिनिधी (नीरज जेठे):-
नगर तालुक्यातील देहरे येथील सुप्रसिध्द जागृत देवस्थान परमहंस सद्गुरू आनंदमाईंचे वर्षे ५३वे पुण्यतिथी सप्ताह सोहळा निमित्ताने हभप बोबडे महाराजांचे किर्तन संपन्न झाले.
यावेळी महाराजांनी परमहंस सद्गुरू आनंदमाईंची महती सांगत, गौमातेचे महात्म्य,आई -वडीलांची सेवा,समाजसेवा केल्याने परम सुखाबरोबर जीवन जगण्याचा परम आनंद मिळतो. असे दुसरे पुष्प गुंफताना आपल्या मधुर वाणीतून बोबडे महाराजांनी व्यक्त केले.
यावेळी सौ.सुनिता बिभीषण करंडे व बाबासाहेब सुर्यभान करंडे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला गायनाचार्य, हार्मोनियम वादक ढोकणे महाराज,मृदंगाचार्य यांनी मोलाची साथ दिली.
यावेळी पंचक्रोशीतील भाविक-भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

