सौरभ कामडी / पालघर
जव्हार - मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे आणि प्रामाणिकपणे करत असून सुद्धा केवळ ६९३० हजार रुपये हे या महागाईच्या काळात तुटपुंजे मानधन मिळते तेही केंव्हाच वेळेवर मिळत नाही त्यामुळे सध्या संगणक परिचालक यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे दिनांक १७ नोव्हेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवून गटविकास अधिकारी चिते जी पंचायत समिती जव्हार यांचेकडे विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांचे प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत, ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकांना समावून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, संगणक परिचालकांना तात्काळ वीस हजार मासिक मानधन देणे. नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टीम रद्द करावी.
अशा विविध मागण्या सदरील निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी जव्हार तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष अविनाश घाटाळ,उपाध्यक्ष राजेश भोये ,खनिजदार संदीप कनोजा, सदस्य सीताराम गरेल,विलास कोरडा ,भास्कर गवळी, बारकू कोरडा,निकिता धनगर,ऋषाली पवार,भुशिता मुकणे,आणि इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
*ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत स्तरावर कर्मचाऱ्यांना किमान वेतन कोतवाल,पोलीस पाटील अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर यांचे मानधनात वाढ झाले आहे परंतु संगणक परिचालक यांचेमध्ये मानधनात वाढ न केल्याने आमच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. - अविनाश घाटाळ , अध्यक्ष जव्हार तालुका संगणक परिचालक संघटना
*सध्या जे आम्हाला मानधन मिळत आहे त्यावर आमचं कुटुंब कसं चालवायचं एकीकडे भयानक महागाई वाढत जात आहे सहा हजार मध्ये मुलांचं बघायचं की आमच्या वडिलांचे किंवा घराकडे बघायचे आमचं तर सोडाच परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याचा शासनाचे अभ्यास करून लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात - उपाध्यक्ष राजेश भोये
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

