shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दूध दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता .....दूधगंगाचे संचालक राजवर्धन पाटलांची दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी भेटी दरम्यान सकारात्मक चर्चा

दूध दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता .....
दूधगंगाचे संचालक राजवर्धन पाटलांची दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी भेटी दरम्यान सकारात्मक चर्चा
इंदापूर : प्रतिनिधी

राज्यात उद्भवलेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि दुधाच्या दरात होत असलेली कमालीची घट लक्षात घेऊन दुधगंगाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेतली. उत्पादनावर होणारा खर्च यामुळे दूधाच्या दरावर परिणाम होत आहे. उत्पादनावर होणाऱ्या जास्त खर्चामुळे आता दूधाचे दर वाढले पाहिजे अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी असून शासनाने त्वरित या सर्व गोष्टी विचारात घेता दूध दराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी यावेळी पाटील यांनी केली. 

दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन १ लाख ली. दुधाचे संकलन करण्यात येत आहे. दुधगंगामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो युवकांना रोजगार व व्यावसायिक हातभार लावण्यात व दुध व्यवसायाला चालना देण्यात दुधगंगा महत्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचा मोबदला देण्याचे काम दुधगंगाच्या माध्यमातून होत आहे. यामुळेच परिस्थिती लक्षात घेऊन दूध दरवाढीसंदर्भात राजवर्धन पाटील यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेऊन सकारात्मक चर्चादेखील झाली.

सदर भेटीत झालेल्या चर्चेनुसार दूध दरवाढीच्या प्रश्नांवर मंगळवारी (दि.२१) दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून दूध दरात प्रति लिटर ७ रुपयांच्या वाढीबाबत निर्णय घेण्याबाबतची सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती दूधगंगेचे संचालक राजवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.
close