अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी श्री धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त हर दिन हर किसी के लिये आयुर्वेद या संकल्पनेवर ‘सर्वांसाठी आयुर्वेद’ या विषयावर रुग्ण आणि नागरिकांसाठी ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत कोटीकर यांच्या व्याख्यानाचे दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

