*बुक गंगा या राज्य पातळीवरील ऑनलाईन पुस्तक विक्रीच्या मुखपृष्ठावर पहिल्यांदा नगरचा अंक*
अहमदनगर प्रतिनिधी:
अनेकानेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त "निशांत दिवाळी अंकाची २३" वी आवृत्ती वाचकांच्या भेटीसाठी उपलब्ध झाली असून, या वर्षी पहिल्यांदा राज्य पातळीवरील पुणे येथील "बुक गंगा" या ऑनलाईन पुस्तक विक्री करणार्या एजन्सीने पहिल्यांदाच अहमदनगरच्या दिवाळी अंकाचा मुखपृष्ठावर समावेश केल्याने हा नगरकरांचा बहुमान असल्याचे संपादक निशांत दातीर यांनी सांगितले.
यावर्षीच्या दिवाळी अंकात आगामी लोकसभा निवडणुकीच्या परिसंवादात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पांडूरंग शिंदे, ज्येष्ठ संगणक तज्ञ दिपक शिकारपुर, ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे, डॉ.विजयकुमार पोटे, प्रा. नंदकुमार गोरे यांचा समवेश आहे.
यश म्हणजे नक्की काय असते? या अभ्यासपुर्ण परिसंवादात अभिनेत्री अनिता दाते, रोहिणी हट्टगंडी, संकर्षण कर्हाडे, अमर ओक, धनश्री लेले यांचे अनुभव कथन लेखांचा समावेश आहे. महिला सक्षमिकरणाच्या अवघड वाटा या सामाजिक ज्वलंत विषयावर अग्रणी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, किरण मोघे, तनजु वाझे, गितांजली वि.म. यांचा समवेश आहे.
आज ते हवे होते यात भुतकाळातील अभिनेत्यांवर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, तेजश्री प्रधान, दिग्दर्शक अशोक हांडे, प्रख्यात गायक नंदेश उमाप, पांडूरंग बलकवडे, अनिकेत आमटे आदिंची मनोगते समविष्ठ आहेत. पैसा आणि बरेच काही या विषयावर ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, संत साहित्याचे अभ्यासक अर्थतज्ञ अभय टिळक, प्रख्यात कवी संदिप खरे, प्रभा गणोरकर, इशा केसकर, शहाजी भोसले आदिंचे विचार शद्बबद्ध करण्यात आले आहेत.
नवी खाद्य संस्कृती या परिसंवादात नगर येथील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.सतीश सोनवणे, राधिका परांजपे, अनुराधा तांबोळकर, मिरा जोशी, कांचन रिद्धी, मनिषा साठे, विष्णू मनोहर आदिंचे लेख आहेत. कविता सदरात आनंद देशमुख, शशि त्रिभुवन, डॉ.सत्यपाल श्रीवास्तव मिहिर कुलकर्णी, ऋता ठाकूर, डॉ.गणेश नजन, वसिमोद्दीन परवाना, डॉ.सुधा कांकरिया यांचा समावेश आहे.
तसेच दत्तात्रय मेहतर, अंजली श्रीवास्तव, नागेश शेवाळकर, आशिष निनगुणकर, भारती सावंत, वसंत दातीर, प्रा.भानुदास बेरड, डॉ.रत्ना नजन, अमोल लेंडे, प्रा.संदिप मोकळ आदिंच्या दिवाळी कथांचा समावेश आहे. एकूण १५२ कृष्ण धवलपाने व १६ रंगीत पानांचा समाविष्ठ असलेला अंक नगरसह पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे येथील विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

