*इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य प्रशंसनीय - ता. .का .सूर्यवंशी सर
इंदापूर: दि. २० जानेवारी केतकेश्वर कार्यालय निमगाव केतकी ता.इंदापूर जि.पुणे येथे झालेल्या इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघाच्या विद्यार्थी गुणगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री काका सूर्यवंशी यांनी हिंदी तहसील अध्यापक संघाचा व पदाधिकारी कार्यकारणी सदस्य यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरौउद्गगार काढले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी ,प्रमुख अतिथी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर जी , विठ्ठल शिंदे पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष , डॉ. रंजना पिंगळे सदस्य महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळ पुणे , उस्मान मुलाणी सदस्य महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळ, श्सुधाकर भोंग समन्वयक पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ, घोरपडे सर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ इंदापूर, प्राचार्य रमेश मचाले छत्रपती हायस्कूल भवानीनगर , प्राचार्य सोळसे सर नंदकिश्वर विद्यालय जंक्शन ,यांच्या उपस्थितीत ठीक १२-१५ वाजता केतकेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी गुणगौरव कार्यक्रम झाला .तालुक्यातील ५० शाळातील ४५० विद्यार्थी १०० पालक व ७० शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहा हिंदी शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले.
1- स्वाती सुहास पुकळे श्री काटेश्वर विद्यालय काटी
3- शंकर मुरलीधर काटकर हिराबाई देसाई विद्यालय बेलवाडी
4- दिपा भानुदास माने श्री हरणेश्वर विद्यालय कळस
5- रविंद्र श्रीरंग सपकळ उदमाई विद्यालय उदमाईवाडी
6- दत्तात्रय काशिनाथ गवळी श्री हनुमान विद्यालय अवसरी
या हिंदी निबंध स्पर्धेत ५० विद्यालयातील ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .यातील प्रत्येक विद्यालयातील प्रथम ३ क्रमांक काढण्यात आले. ४५० मुलांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सर्जेराव रणमोडे यांनी केले .त्यांनी संघाच्या कार्याची ओळख करून दिली.
यावेळी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर श्रीमती डॉक्टर रंजना पिंगळे विठ्ठल शिंदे उस्माण मुलाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघाचे सचिव के .डी.भोंग यांनी आपल्या मधुर वाणीतून केले .
या कार्यक्रमास . मचाले सर , सोळसे सर ,.जगताप गणेश सर ,.शब्बीर मुलाणी सर ,.सुनील डोंबाळे सर , चव्हाण सर , दीपक निंबाळकर सर , भागवत नाईक सर , वाघ सर उपाध्यक्ष विद्या भागवत मॅडम मुख्याध्यापीका मनीषा भोसले मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार संजीव कुमार पांढरे सर यांनी मानले.

