shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नमो चषक अंतर्गत स्पर्धा मध्ये आ. नमिता मुंदडा यांनी लुटला स्लो सायकलिंगचा आनंद!!

 प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी   :-                           

नमोचषक २०२४ अंतर्गत होत असलेल्या विविध स्पर्धा अंतर्गत आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी स्लो सायकलिंग स्पर्धे मध्ये उपस्थीत स्पर्धक तसेच प्रेक्षक मुलींच्या आग्रहास्तव स्लो सायकलिंग करून आनंद लुटला. 232 केज विधानसभा मतदारसंघात आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा केज व अंबेजोगाई शहरात आयोजित करण्यात आल्या आहेत. 




या स्पर्धांना खेळाडू व प्रेशकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अंबेजोगाई शहरात स्लो सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दि. 21/01/2024 स्लो सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत प्रेशक व खेळाडूंनी आ. नमिता अक्षय मुंदडा यांना स्लो सायकलिंग करण्याचा आग्रह धरला असता आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी स्लो सायकलिंग खेळून प्रेशक व खेळाडूंचा आनंद द्विगुणीत केला. आ. नमिता अक्षय मुंदडा या  लॉन टेनिसच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू आहेत हे विशेष. त्या आपल्यातील खेळाडूचे विविध स्पर्धांमध्ये दर्शन घडवत असतातच. यामुळे खेळाडू मध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. तसेच केज शहरांमध्ये दिनांक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन देखील आमदार नमिता अक्षय मुंदडा व बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

close