Jan 22, 2024
नाम श्रीराम.. शब्दालंकार
गुणांची खाण
घ्यावे नाम श्रीराम,
सदाचारी सदा
कांतीवान श्रीराम,
तेजस्वी वीर
विद्वान श्रीराम,
कृतज्ञ सहयोगी
सामर्थ्यवान श्रीराम,
प्रियदर्शन एकवचनी
सत्यवान श्रीराम,
जितेंद्रिय धर्मज्ञ
धैर्यवान श्रीराम,
गावे मुखी
मधुर गाण श्रीराम,
जगी सहिष्णू
आपुले प्राण श्रीराम..
दीपक महाले, शिरूर कासार
मो.98 23 38 49 09

