shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वस्त धान्य दुकानदार बाबासाहेब नागनाथ देवकर भोसा यांच्या देवकर निवासस्थानी आनंद उत्सव

आयोध्या नगरी येथील भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिरात होत असलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने स्वस्त धान्य दुकानदार बाबासाहेब देवकर यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत एक प्रकारे आनंद उत्सवाच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली.


         प्रदीर्घ संघर्षानंतर आयोध्येत श्रीराम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याने देशभरात आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात गावोगावी साजरा केला जात आहे स्वस्त धान्य दुकानदार बाबासाहेब देवकर देवकर भोसा या निवासस्थानी कुटुंबीयांनी घराच्या परिसरात पणत्या, दिवे जागोजागी लावून वातावरण आनंदमय केले आहे एकूणच प्रभू श्री राम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्ताने जिकडेतिकडेत चोहीकडे आनंदी आनंद गडे असेच पहावयास मिळत आहे
close