श्रीरामपुर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर शहरालगतच असलेल्या रमानगर येथे भारतीय लहुजी सेना महिला आघाडीच्या वतीने मकरसंक्रांती निमित हाळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता आशालताई दिघे‌ या होत्या.

यावेळी बोलताना आशालताई
म्हणाल्या की, महिलांनी बचत गटाचा माध्यमातून घरगुती पद्धतीने होवू शकलेले खाद्यपदार्थ तसेच रेडिमेड कपडे,महिलांचे वस्त्र, महिला श्रृंगार आदी अशा वेगवेळ्या प्रकारचे वेगवेगळी व्यावसाय करावे, याकरीता आपण त्यांना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय योजानांचे फायदे तसेच अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीतील विविध शासकीय योजानांचे फायदे नक्कीच मिळवून देण्यात आवर्जून पुढाकार घेत ते सर्व फायदे महिलांना मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब दिघे,भारतीय लहुजी सेनेचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पत्रकार नंदकुमार बगाडे, श्रीरामपुर तालुका महिला आघाडी प्रमुख रोशन शेख, श्रीरामपुर तालुका उपाध्यक्ष रमजान शेख,श्रीगोंदा उपाध्यक्ष, अमोल सूडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजची महीला ही सक्षम आहे, पुरुषांच्या मागे न राहता पुरुषांबरोबरीने नोकऱ्या, व्यावसाय व्यवस्थितरित्या संभाळत आहे,करीता कोणतीच महिला मागे रहाता कामा नये, प्रत्येक महीला ही पुरुषांबरोबरच मुख्य प्रवाहात आली पाहिजे याकरीता माझे सातत्याने प्रयत्न आहेत,भारतीय लहुजी सेना आयोजित मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी आपण आज एकत्र आलो असलो तरी पुढे विविध प्रकारच्या व्यावसायातून देखील अशीच प्रगती दाखवू तथा प्रत्येक महिलेस स्वतः चे स्थान निर्माण करण्यासाठी हातभार लावत तीला सक्षम करु या जिद्दीने प्रत्येक महिला आज जागृत होणे ही काळाची गरज बनलेली आहे.
यासाठी आपण महिलांना लवकर विविध शासकीय योजानांचे फायदे मिळून देणार आहोत करीता महिलांनी बचत गटासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे यासोबतच विविध प्रकारचे व्यावसाय करत सक्षमही झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,सोबतच कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब दिघे यांनीही मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी, मिनाज शेख, मंगल आहिरे,सोनल आहिरे, सुमित्रा देवी बगाडे, पूनम दुशिंग, राजश्री बागुल,परवीन शेख,सोनाली जांवजाळ, कावेरी पवार,भारती आव्हाड,मधु बागुल,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगल आहिरे यांनी केले तर मधू बागुल यांनी आभार मानले.

*पत्रकार नंदकुमार बगाडे - श्रीगोंदा
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111