shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुरवलीत विशेष श्रमसंस्कार शिबीर सुरू .

कुरवलीत विशेष श्रमसंस्कार शिबीर सुरू .
फोटो ओळ - कुरवली ता. इंदापूर येथे श्रम संस्कार उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.....
इंदापूर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय अंतर्गत कुरवली ता. इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सरपंच राहुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष प्रकाश कदम उपस्थित होते.यावेळी प्राचार्य  डॉ अंकुश आहेर,उपप्राचार्य  ज्ञानेश्वर गुळीग,मुख्याध्यापिका ज्योती धावणे ,पोलीस पाटील विलास कणसे ,ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम ,शिवाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पांढरे, बापूराव  चव्हाण, बापूराव पांढरे इ मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे  प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी शिबीर काळातील उपक्रम आणि शिबिराचे महत्व सांगितले.  मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले व सहित्यपुजन संपन्न झाले. माजी सरपंच दिलीप पांढरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी मी आपल्या  विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचा १९८९ सालच्या बॅचचा एनएसएसचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. गावात शिबीर होत असल्याचे समाधान होत असून महाविद्यालयाबद्दल ऋण व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरवली च्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती धावणे यांनी विद्यार्थ्यांना शिबिर काळामध्ये करावयाची कामे आणि त्याचे नियोजन तसेच विद्यार्थी म्हणून आपले समाजाबद्दल असणारी जबाबदारी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ अंकुशराव आहेर  यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतील विशेष श्रमसंस्कार शिबिराचे असलेले महत्त्व विशद केले. व विद्यार्थ्यांनी या शिबिरादरम्यान उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये होणारे बदल तसेच आपल्या आयुष्यातील ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना ही एक मोठी संधी म्हणून पाहण्या विषयीचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. सूत्रसंचालन प्रा.कपिल कांबळे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.ज्योत्स्ना गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


close