*अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार
*बदलाची सर्वांनी नोंद घेण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे.
या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक सोमवार २२ जानेवारी २०२४ असा होता. परंतु सोमवार दि.२२ जानेवारी, २०२४ रोजी श्री. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्यामुळे भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्याची अंतिम प्रसिद्धी दिनांक २३ जानेवारी, २०२४ रोजी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात मतदार याद्याची अंतिम प्रसिद्धी मंगळवार २३ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे.
या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविले आहे.
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111

