shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यात ४५ लोकसभा जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला ओबीसी नेत्यांचा विसर...!


 वजीर शेख - पाथर्डी 
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी शेटजी भटजीचा भाजपा पक्ष हा तळागाळात नेवून पोहाचविला नव्हे तर त्यासाठी मोठा संघर्ष केला. ३० वर्ष सत्तेत नसलेला भाजप सत्तेत आणण्याची किमय्या महाराष्ट्रात लोकनेत्यांमुळे झाली परंतु भाजपाचे धोरण म्हणजे गरज 'सरो वैद्य मरो'अशीच राहिलेली आहे.


 ज्या लोकनेत्याने काँग्रेस विरोधी रंगशिंग फुंकून भाजपाला चांगले दिवस आणून दिले त्याच नेत्याचे विस्मरण सध्याच्या भाजपाला झाल्याचे दिसत आहे. बीड जिल्हा हा लोकनेत्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा त्यांच्याच जिल्ह्यात   प्रदेश भाजपाकडून दिलेल्या डिझाईनमध्ये त्यांच्या फोटोला शून्य स्थान देण्यात आले. राज्यात जर ४५ जागा जिंकण्याचे स्वप्न भाजपा पाहत असेल तर ओबीसी नेत्यांचा विसर पडून चालणार नाही. आज भाजपाने वेगवेगळ्या पक्षातील ओबीसी नेत्यांना सोबत घेवून कुरुवाळले आहे परंतु जे ओबीसी नेते पक्षात अगोदर म्हणजे २०१४  च्या निवडणुकीत होते त्या नेत्यांचा पक्षही गिळला आणि नेतेही संपविले ही भाजपाची निती म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का?असा सवाल उपस्थित होतो आहे. सत्तेच्या मांसाचा आणि ईडीचा व सी.बी.आय.चा धाक दाखवून सोबत घेतले आहे. परंतु सामान्य मतदारांच्या मनात काय चालले आहे याचा विचार भाजप नेतृत्वाने केलेला दिसत नाही, जे बॅनर डिझाईन करण्यात आले आहे त्याची संकल्पना ही प्रदेश भाजपाची असून स्थानिक नेतृत्वाला यात फेरबद्दल करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आणि राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये त्याचे डिझाईनचे बॅनर लावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रदेश भाजपा ही खोडसाळपणा करत असल्याचे सिद्ध होत आहे.
      लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष हा वाडी,वस्ती, तांड्यावर नेवून कसलेही साधन आणि संपती नसताना कार्यकर्त्यांचे वाहन नेवून त्या ठिकाणी संघटन केलेले आहे. आज लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे आणि स्व.प्रमोदजी महाजन यांचा विसर भाजपाला पडल्याचे दिसत आहे. कारण भाजपाला जुन्या जाणत्या आणि पक्षासाठी योगदान देणार्‍या नेत्यांच्या योगदानाची किंमत राहिलेली नाही. आता 'सत्तामेव जयते' हेच एकमेव धोरण ठरलेले आहे आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे. देशातील ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या संस्थांचा वापर करुन इतर पक्षातील नेत्यांना खेचले जात आहे. ज्यांचा आणि त्यांच्या विचारांचा आयुष्यभर ज्यांनी तिरस्कार केला अशी माणसं व असे नेते भाजपसोबत येत आहेत. येणारे नेते हे केवळ स्वतःवरील कार्यवाही टळावी म्हणून भिती पोटी येत आहेत. एकूणच बदललेले भाजप हे कोणाच्याही पचणी पडलेले नाही. परंतु कोणी बोलू शकत नाही?स्वपक्षातील नेत्यांवरसुद्धा प्रचंड दबाव आहे. त्याठिकाणी कोणी बोलू शकत नाही. भाजप स्वपक्षातील नेत्यांना विचारत नाही ही शोकांतिका आहे. लोकनेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा तळागाळात नेवून पोहाचविली.वेगवेगळ्या पदांवर राहून त्या पदाला गरिमा प्राप्त करुन दिली. लिमिटेड लोकांचा पक्ष हा बहुजनांचा बनला आणि सत्तेत आणण्याचे काम त्यांच्या प्रयत्नांमुळे झाले आहे. आज भाजपा पूर्णतः मुंडेंच्या कार्याला विसरली आहे. सध्या महायुतीच्या बैठका राज्यभरात सुरु आहेत. या महायुतीच्या बॅनरचे डिझाईन प्रदेश भाजपाने बनविल्याची माहिती मिळाली आहे. त्या बॅनरवर स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे यांचे फोटो छापले आहेत तिघांचे ही कार्य नक्कीच मोठे आहे परंतु ज्या नेत्यांमुळे आपला पक्ष बहुजनांचा आणि ओबीसींचा डि.एन. ए. झाला त्या नेतृत्वाला पक्ष विसरला की जाणीवपूर्वक टाळला याचे उत्तर काही दिवसात मिळणार आहे. शिवसेनेच्या दोन-दोन नेत्यांचे फोटो टाकण्याचे सुचते परंतु ज्यांनी भाजपाला तळागाळाचा चेहरा बनविले त्या नेतृत्वाला पक्ष कसा काय विसरु शकतो? असा सवाल उपस्थित होतो आहे.त्यासोबतच बीड जिल्ह्याचे भूषण आणि केंद्रीय मंत्री म्हणून ज्यांनी कारर्किर्द गाजवली आणि पंतप्रधानांची सावली म्हणून जे राहिले ते स्व.प्रमोदजी महाजन यांनासुद्धा भाजपा अल्पावधीत विसरुन गेले. कृतघ्न बनलेली भाजपाची नेते मंडळी ही सध्या  सत्तामेव जयते' भोवती घिरट्या घालत आहे.सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी यांनी ठेवलेली आहे. परवा बीड येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी लोकनेत्यांचा फोटो बॅनरवर नसल्याने राडा केला आणि बॅनरवर फोटो लावण्यास भाग पाडले. ही रणनिती भाजपचीच असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याठिकाणी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे बैठकीचे आयोजक असल्याने अनेकांनी त्यांच्यावर शंका घेतली परंतु त्यात सत्यता नव्हती हेही स्पष्ट झाले. प्रदेश भाजपाने सत्तेच्या मस्तीतून बाहेर येण्याची गरज निर्माण झाली आहे. जर तुम्ही घेतलेल्या आयाराम,ओबीसी नेतृत्वावर जिंकण्याचे स्वप्न पाहत असाल तर पुलाखालून पाणी कधी वाहून गेले हे कळणारसुद्धा नाही. याचे भान ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे
- *प्रा. सुनिल पाखरे
सह्याद्री भवन,कडा रोड माणिकदौंडी 
ता.पाथर्डी जि.अहमदनगर
close