पुणे :-  सोलापूर येथे मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वा. आयोजित *लढा वडार आरक्षणाचा - चिंतन शिबिर* पूर्वतयारी आढावा बैठक सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी *पुणे येथे उत्साहात संपन्न* झाली.
सदर बैठकीत सोलापूर येथील नियोजित *लढा वडार आरक्षणाचा - चिंतन शिबीर बाबत आणि वडार जोडो संकल्प अभियान, पश्चिम महाराष्ट्र दौरा* बाबत आढावा घेण्यात आला. 


         आपल्या वडार समाजातील *सुशिक्षित महिला कु. संगिताताई पवार* यांनी यवतमाळ जिल्ह्यात *दारूबंदी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य* पाहून आणि त्यांनी आत्ता घेतलेला *वसा आणि वडार  समाज कार्य*  पाहून उपस्थित मान्यवरांनी *पाठबळ* देण्याचा व  सोलापूर येथील चिंतन शिबीरात *मोठया संख्येने* सहभागी होण्याचा *सर्वांनुमते निर्णय* घेण्यात आला.
     सदर बैठकीस आपल्या समाजाचे *मा. श्री. भारत निंबाळकर, से. नि. सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे मा. श्री. एस. एन. पवार, से.नि. सह संचालक - शिक्षण विभाग, पुणे मा. डॉ. श्री. सुरेश धोत्रे, से. नि. सह संचालक - आरोग्य सेवा, पुणे मा. श्री. सुरेश विटकर, से.नि. उपायुक्त - विक्री कर, पुणे मा. श्री. मसाजी काळे, से.नि. उप अधिक्षक पोलीस, पुणे, मा. श्री. शंकर कुसमुडे, से. नि. एस एस सी बोर्ड, पुणे मा. श्री. हरिदास धनवडे, आरोग्य सेवा, पुणे मा. श्री. नामदेव धनवडे, से.नि. मुख्य लेखाधिकारी एम एस ई बी. पुणे मा. प्रा. श्री. विठ्ठल रणशूर, पुणे, मा. श्री. सदाशिव जाधव, आरोग्य सेवा, पुणे मा. श्री. शांताराम मनवरे, पुणे मा. श्री. अशोक इटकर, पुणे, मा. श्री. हरिष बंडीवडार पुणे इ. मान्यवर* उपस्थित होते.