shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा व मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

पडस्थळ  येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा व मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
इंदापूर : सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पडस्थळ (ता. इंदापूर ) येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा व मंदिर लोकार्पण सोहळा निमित्ताने गावातील राममंदिरात मुर्ती अभिषेक,भजन, कीर्तन तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मूर्तीस अभिषेक करून भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी १० ते १२ या वेळेत समर्थ सद्गुरु शिवलाल स्वामी महाराजांचे सुस्राव्य असे किर्तन झाले. त्यांनी आत्ताच वयाची शंभरी पूर्ण केली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवलाल स्वामी महाराजांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला होता. आज पडस्थळ येथे झालेल्या प्रभू श्रीराम उत्सव सोहळ्यात महिलांची व भाविकांची मोठी उपस्थिती होती. १२:३० वा. आरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे पडस्थळ गावात स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. यावेळी गावातील हनुमान मंदिर, एस टी बसस्थानक,विठ्ठल रुक्मिणी मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय पडस्थळ या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यासाठी गावातील संत निरंकारी मंडळाची मोलाची मदत झाली. महेंद्र रेडके, पोपट वाघमोडे, अनंता राऊत, गणपत पवार, विठ्ठल राऊत, भाऊसाहेब हजारे, अर्जुन चौगुले, तसेच महिला भगिनींनी देखील या स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. गावातील घरावरती भगवा झेंडा व गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी दीपोत्सव करून या सोहळ्याची सांगता करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस प्रशासन अधिकारी यांनी देखील उपस्थित राहत चोख बंदोबस्त ठेवला.
close