तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने पत्रकारांचा व कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांचा सन्मान .
इंदापूर : दि.६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिना निमित्त इंदापूर पोलिस स्टेशन येथे तेजपृथ्वी ग्रूप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांनी डायरी, पेन , गुलाब फुल व मिठाई बॉक्स देऊन पत्रकारांचा व कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांचा सन्मान केला.

यावेळी धरमचंद लोढा (पप्पा)देवीदास वाघमोडे, विकास शिंदे, सद्दाम बागवान,बाळासाहेब शिरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.
 बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार आहेत ज्यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून देशात मराठी पत्रकारितेचे युग सुरू केले.  त्यांचे विचार, काम करण्याची पद्धत आणि समाजात जागृती आणण्यात त्यांची भूमिका. बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले मराठी दैनिक ६ जानेवारी रोजी प्रकाशित झाले आणि हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.