shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील पाटबंधारे(इरिगेशन) ऑफिसच्या प्रगंणात मद्यपी रोडरोमीओचा धांगडधिंगा!!

(नागरिक त्रस्त पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष).

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज शहरातील उमरी रस्त्यालगत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या भागात मध्यवर्ती ठिकाणी सुमारे दोन ते तीन एकर मध्ये असलेल्या पाटबंधारे कार्यालय, उपविभागीय अभियंता लघुपाटबंधारे, जलसिंचन शाखा केज हे तिन्ही कार्यालय या ठिकाणी आहेत या कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात रात्रंदिवस रोडरोमिओ यांचा बिंदास वावर असतो. या ऑफिसच्या प्रगंणात दारू पिऊन धिंगाणा घातला जात असल्यामुळे या भागातील जनता त्रस्त झाली आहे. सर्वत्र दारूच्या बाटल्या, सिगारटचे पाकिटे पडलेली दिसत आहेत. 


या भागातून कॉलेजला, शिकवणी, तसेच शुक्रवार बाजार करण्यासाठी जाणाऱ्या महिलांची व मुलींची छेड काढण्याचे प्रकार वारोंवर होत आहेत. या ऑफिसच्या मैदानात  टुकार मुलांचे टोळके दिवसभर मोठ मोठ्याने ओरडत असतात यावर कोणाचाही अंकुश नाही इरिगेशन ऑफिसच्या संरक्षण भिंतीच्या आडोशाचा शौचालय सारखा वापर होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मागील काही दिवसात मद्धधुंद अवस्थेतील इसमाने  कार्यालयाची तोडफोड केली होती यावर सदर ऑफिस ने पोलीस कडे तक्रार करून ही काही फरक पडला नाही. तरी दारुड्या व टुकार लोकांकडून होणारा त्रास ताबडतोब कर बंद करावा अशी मागणी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

close